

MLA Sanjay Kelkar
ESakal
ठाणे : महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागात गेल्या दहा वर्षांपासून लेखापरीक्षण झालेले नसल्याचा आणि या काळात मालमत्ता वाटपात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. या विभागात आर्थिक अपहार झाल्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांकडे विशेष लेखापरीक्षणाची मागणी करण्यात येणार असल्याचे देखील आमदार केळकर यांनी स्पष्ट केले.