क्लब वेट्रेस ते ऑस्कर विजेती, 'ही' कहाणी आहे अभिनेत्री 'रेनी झेल्विगर'ची...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

क्लबमध्ये वेट्रेस ते ऑस्कर अवॉर्ड, ही कहाणी आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर अवॉर्ड पटकावणाऱ्या 'रेनी झेल्विगर'ची. या स्टोरीतून आपण जाणून घेणार आहोत तिचा जीवनप्रवास, तिला मिळालेलं स्टारडम आणि जीवनातील चढ-उतारांबद्दल. 

मुंबई - क्लबमध्ये वेट्रेस ते ऑस्कर अवॉर्ड, ही कहाणी आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर अवॉर्ड पटकावणाऱ्या 'रेनी झेल्विगर'ची. या स्टोरीतून आपण जाणून घेणार आहोत तिचा जीवनप्रवास, तिला मिळालेलं स्टारडम आणि जीवनातील चढ-उतारांबद्दल.    

या वर्षी हॉलिवूडमध्ये बोलबाला राहिला तो 'रेनी झेल्विगर' हिचा. वर्षभरातील जवळजवळ सर्वच अवॉर्ड्स 'रेनी'ने पटकावलेत. मात्र आज ज्या जागेवर रेनी आहे, त्या जागेवर पोहोचणं अत्यंत कठीण असतं. 'रेनी'च्या बाबतीत देखील असंच काहीसं घडलंय. 'रेनी'च्या वडलांची नोकरी गेली आणि रेनी एका क्लबमध्ये वेट्रेस म्हणून कामाला लागली. या क्लबमध्ये रेनी कॉकटेल सर्व्ह करायचं काम करायची. 

मोठी बातमी - 'म्हणून' तुमचे पैसे वाचतायत; कोरोनाचा जगावर असाही परिणाम...

अँड ऑस्कर गोज टू... 

...आणि सर्वोत्तम अभिनेत्रीचा अवॉर्ड जातोय 'ज्युडी' सिनेमात उत्तम भूमिका साकारणाऱ्या  रेनी झेल्विगर​ हिला. ऑस्करच्या स्टेजवर ही घोषणा झाली आणि 'रेनी'च्या आनंदाला पारावार राहिला नाही. बाफ्टा, गोल्डन ग्लोब, क्रिटिक चॉईस... यंदा जवळजवळ प्रत्येक अवॉर्ड हा 'रेनी'च्या नावावर झालाय.  

'रेनी'ने अमेरिकेतील 'ज्युडी गारलँड' नावाच्या प्रसिद्ध अशा अभिनेत्रीची भूमिका 'ज्युडी' सिनेमामध्ये साकारली आहे. एक उत्तम अभिनेत्री, नर्तिका आणि गायक म्हणून 'ज्युडी गारलँड' यांनी अमेरिकेतील हॉलिवूड इंडस्ट्रीत तब्बल चार दशकं गाजवलीत. १९६१ मध्ये आपलं लाईव्ह रेकॉर्डिंग 'Judy at Carnegie Hall' या अल्बमसाठी ग्रामी अवॉर्ड मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. याच 'ज्युडी' यांची भूमिका 'रेनी'ने बिग स्क्रिनवर साकारलीय. ज्यासाठी आज 'रेनी'ला अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्करने नावाजलं गेलंय. 

मोठी बातमी - दाऊदचा विश्वासू आणि कुख्यात गुंड तारीक परवीनला अटक!

'रेनी'ला बनायचं होतं पत्रकार 

'रेनी'ने पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. 'रेनी'ला पत्रकार व्हायचं होतं. मात्र तिच्या कॉलेज लाईफमध्ये तिनं काही नाटकांमध्ये हिस्सा घेतला आणि 'रेनी'चं मन अभिनयाकडे वळलं. मात्र 'रेनी'चा अभिनेत्री बनण्याचा प्रवास सोपा नवहता.    

वेट्रेस ते ऑस्कर जिंकणारी अभिनेत्री 

'रेनी'चे वडील यांचा तेल रिफायनरी कंपनीचा व्यापार होता. मात्र, काही कारणामुळे त्यांची नोकरी गेली. त्यामुळे आता रेनीसमोर कॉलेजला कसं जायचं? कॉलेजची फी कशी भरायची? असे अनेक प्रश्न उभे राहिलेत. वडलांची नोकरी गेल्याने 'रेनी'ला आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी नोकरी करावी लागली. यानंतर 'रेनी'ने एका वेट्रेस म्हणून  काम करणं सुरु केलं. तिला या कामातून जे पैसे मिळायचे यामधून तिने तिच्या कॉलेजची फी भरली. अशात कॉलेजमध्ये असताना तिने काही नाटकांमध्ये काम केलं, यामार्फत तिला अभिनयाची संधी उपलब्ध झालीत. एका जाहिरातीत काम केल्यांनतर तिला 'स्क्रीन ऍक्ट्रेस गिल्ड कार्ड' मिळालं. 

मोठी बातमी - राज ठाकरेंचे 9 अंकाच्या मदतीने नवनिर्माण ! मोर्च्यातही 9 अंकाचा बोलबाला

लहान-लहान पावलं आणि मोठी झेप 

कॉलेजमध्ये शिक्षण घेत 'रेनी'ने नाटकांमध्ये काम केलं, यानंतर १९९२ नंतर तिने लहान मोठ्या सिनेमांमध्ये देखील काम केलं. १९९४ मध्ये 'रेनी'चा एक हॉरर सिनेमा आला होता. हा सिनेमा सपशेल पडला, मात्र या सिनेमात काम करणाऱ्या 'रेनी'ची छाप सर्वांवर पडली. प्रत्येक वर्तमानपत्रात, प्रत्येक मासिकांमध्ये चारचा होती ती फक्त 'रेनी'ची. 

टॉम क्रूझच्या एका सिनेमामुळे मिळालं स्टारडम 

१९९६ मध्ये 'रेनी'ने Jerry Maguire या सिनेमात एका 'सिंगल मदर'चा रोल केलेला. या सिनेमात 'रेनी'ने टॉम क्रूज सोबत स्क्रीन शेअर केली. यानंतर 'रेनी'ला हॉलिवूडमध्ये स्टारडम मिळालं. या रोलसाठी, टॉम क्रुजने 'रेनी'चं नाव सुचवल्याने तिच्याकडे आज असलेल्या स्टारडममध्ये टॉम क्रूजचा देखील हात आहे, असं बोललं जातं.   

मोठी बातमी - गणेश नाईकांना मोठा धक्का; कट्टर समर्थक सोडतायेत साथ...

मोठा ब्रेक आणि कडक कमबॅक 

'रेनी'ने अनेक सिनेमांमध्ये काम केलं, यशाच्या शिखरावर असताना रेनीने सिनेमापासून स्वतःला अलिप्त केलं आणि मोठा ब्रेक घेतला. यामुळे 'रेनी'चे चाहते चांगलेच नाराज झालेत. तब्बल सहा वर्ष ब्रेक घेतल्यानंतर २०१६ मध्ये 'रेनी'ने पुन्हा दमदार कमबॅक केलं. त्यानंतर 'रेनी'ने पुन्हा एकदा आपल्या अभिनयातून लोकांची मनं जिंकलीत.  

दोन दशकांपासून जास्त काळ काम करताना 'रेनी'ने अनेक चढ-उतारांचा सामना केला. २००३ साली देखील 'रेनी'ला ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता. त्यामुले आज मिळालेला ऑस्कर 'रेनी'चा दुसरा ऑस्कर अवॉर्ड आहे.  

मोठी बातमी - हिंगणघाटातील पीडितेच्या मृत्यूनंतर अजित पवार 'शिक्षेबद्दल' म्हणालेत..

club waitress to oscar award winner this is story of actress Renee Zellweger 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: club waitress to oscar award winner this is story of actress Renee Zellweger