पक्षाने दिलेली जबाबदारी निभावल्याचा जास्त आनंद - आमदार गणपत गायकवाड

गोव्यातील विजयानंतर कल्याण पूर्वेत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
Ganpat Gaikwad bjp mla
Ganpat Gaikwad bjp mlasakal media

डोंबिवली : चार राज्यात भाजपची (bjp) एकहाती सत्ता आली आहे. आयुष्यात पहिल्यांदा गोव्यातील (goa assembly election) कानकोन मतदार संघाची जबाबदारी भाजप पक्षाने (bjp party) माझ्या खांद्यावर दिली होती. तेथेही भाजपचा विजय झाला असून जिम्मेदारी योग्य रितीने पार पाडल्याचा जास्त आनंद होत असल्याचे सांगत भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी आनंद व्यक्त केला.

Ganpat Gaikwad bjp mla
मुंबई - कलिना विद्यापीठात बॉम्बस्फोटाची खोटी माहिती देणारा अटकेत

भाजपला चार राज्यात मिळालेल्या यशानंतर कल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला. यावेळी आमदार गायकवाड यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले, ज्या पद्धतीने चार राज्यात सत्ता मिळाली आहे, मतदारांनी पक्षाला जो कौल दिला आहे त्या सर्व मतदारांचे आम्ही आभारी आहोत.

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची गिरे तो भी टांग उपर अशी अवस्था आहे, त्यांना गोव्यात नोटा एवढे देखील मतदान झाले नाही अशी टिका आमदार गायकवाड यांनी नाव न घेता शिवसेनेेवर केली. केवळ भाजपला पाडायचे म्हणून त्यांनी उमेदवार तेथे उभे केले होते. त्या उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान करत त्यांची जागा मतदारांनी त्यांना दाखवून दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपा दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यात देखील भाजप कार्यकर्त्यांनी लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com