

Uran Municipal Council Election
ESakal
नवी मुंबई : उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत गड आला पण सिंह गेला, अशी परिस्थिती भाजपची झाली. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा यांचा महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार भावना घाणेकर यांनी पराभव केला; परंतु भाजपच्या १२ नगरसेवकांचा विजय झाल्याने भाजपला उरण नगर परिषदेतील सत्ता राखता आली.