महापालिका मुख्यालयात भाजप नगरसेवकांनी केलं 'हे' अनोखं आंदोलन; महापौरांकडे केली 'या' गोष्टीची मागणी.. 

bjp protest
bjp protest

मुंबई: कोरोनाच्या कठीण परिस्थितीत हे महाविकास आघाडीचं सरकार योग्य ती पावलं उचलण्यात अपयशी  ठरत आहे असा आरोप सतत भाजपकडून केला जातोय. तसंच पालिकेनं कोरोनाबाधित मृतदेहांसाठीचे कव्हर जास्तीची किंमत देऊन खरेदी केले असाही आरोप भाजपकडून करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी आज महापालिकेच्या मुख्यालयात अनोखं आंदोलन केलं.    

कोविड बाधित मृतदेहांंसाठी महापालिकेने पाच पट किंमतीत डेड बॉडी कव्हर विकत घेतल्याचा आरोप करत भाजपने आज महापालिका मुख्यालयात आंदोलन केले. त्याच बरोबर गेल्या तीन महिन्यात कोविडसाठी झालेल्या खरेदीच्या चौकशीची मागणी त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली.

महापालिकेने 6 हजार 700 रुपयात डेड बॉडी कव्हर विकत घेतले.तर बाजार 500 रुपयांपासून दिड हजार रुपयां पर्यंत उपलब्ध आहे. हे डेडबॉडी कव्हर परीधान करुन भाजपच्या नगरसेवकांनी आज महापालिका मुख्यालयात आंदोलन केले. भाजपने या बाबत 13 मे रोजी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली होती.

तेव्हा प्रशासनाकडून ही निवीदा प्रक्रीया थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र,यापुर्वी झालेली खरेदी कोणत्या अधिकार्यांच्या किंवा राजकीय व्यक्तीच्या आदेशानेे झाली हे उघड व्हायला हवे असे भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

दुष्काळ आवडे सर्वांना त्याच प्रमाणे कोविड आवडे अधिकाऱ्यांना अशी परीस्थीती आली आहे.यापुर्वीही एन-95 मास्कही पालिका चढ्या भावाने खरेदी करत असल्याचे भाजपनेच लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात कोविड आजारासाठी झालेल्या सर्व खरेदीची चौकशी महापौर किशोरी पेडणेकर यांनी करावी अशी मागणीही शिंदे यांनी केली. 

BJP protest in bmc head office for this reason 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com