

BJP Ravindra Chavan banner in Dombivli
ESakal
डोंबिवली : डोंबिवलीत भाजपाकडून लावण्यात आलेल्या एका बॅनरने वरकरणी महायुती आतून मात्र सत्तासंघर्ष अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा फोटो आणि त्यावर लावण्यात आलेला संदेशाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या बॅनरवर ''इस बार जवाब ही ऐसा देंगे, फिर कभी सवाल ही नही उठेगा...!'' असा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा राजकीय संदेश असल्याची चर्चा सध्या जोर धरु लागली आहे.