esakal | "मनसुख प्रकरणातील सुनील मानेच्या नातलगांचा शिवसेनेशी घनिष्ठ संबंध"

बोलून बातमी शोधा

Mansukh-Sunil-Mane-Shivsena

भाजपच्या अतुल भातखळकर यांची सडकून टीका

"मनसुख प्रकरणातील सुनील मानेच्या नातलगांचा शिवसेनेशी घनिष्ठ संबंध"

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी सुनील मानेचे आणि त्याच्या नातलगांचे शिवसेनेशी घनिष्ठ संबंध आहेत. या नातलगांनी अनेक बेकायदा कृत्ये केल्याचा संशय आहे. त्यामुळे माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली. भातखळकर यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) महासंचालकांना पत्र लिहून ही मागणी केली. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे. आतापर्यंत माने यांचे शिवसेनेशी संबंध असल्याची कुजबूज होती. मात्र आता भातखळकर यांनीच थेट आरोप केल्याने या संदर्भातील चर्चेला उधाण आले आहे. माने यांचे नातलग असलेले शिवसेनेचे नगरसेवक दांपत्य कोण? अशीही चर्चा सध्या सुरु झाली आहे.

हेही वाचा: मनसुखच्या हत्येच्या वेळी सुनील माने तिथेच होता; NIAचा दावा

माने यांचे अनेक नातलग शिवसेनेत असून त्यांची बहीण व बहिणीचे पती हे शिवसेनेचे नगरसेवक होते. तसेच खुद्द सुनील माने यांचा शिवसेनेच्या नेत्यांशी सुद्धा जवळचा संबंध असल्याने त्यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करावी. कदाचित त्यातून सचिन वाझे यांच्याप्रमाणेच माने यांचे शिवसेना कनेक्शन व त्यामुळे त्यांच्यावर कोणीतरी मेहेरनजर दाखवली होती का? हेदेखील उघड होईल, असंही भातखळकर म्हणाले.

हेही वाचा: मनसुख हिरेन प्रकरण: आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला अटक

मनसुख हिरेन यांना पोलीस अधिकारी तावडे या नावाने फोन करून घराबाहेर बोलविल्याप्रकरणी माने यांना अटक करण्यात आली आहे. माने यांचे शिवसेना कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पण, सुनील माने यांची बहीण ही मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथून नगरसेविका होती. तर सुनील माने यांच्या त्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेकडून चार वेळा नगरसेवक होते. इतकेच नव्हे तर सुनील माने यांचा सख्खा भाऊ व त्यावेळी नगरसेवक असलेले त्याच्या बहिणीचे पती यांनी पत्रा चाळीतील नागरिकांना घरे रिकामी करण्यासाठी दमदाटी करण्याचा प्रकार केला होता. त्यात सुनील माने यांचा सुद्धा सहभाग होता, असा खळबळजनक आरोप भातखळकर यांनी केला आहे.

हेही वाचा: मनसुख हिरेन प्रकरणात WhatsApp कॉल ठरला महत्त्वाचा

"काही दिवसांपूर्वी झालेल्या पीएमसी बँक घोटाळ्यात ज्या शिवसेना नेत्यांना कर्जे मिळाली, त्यांच्याशी सुनील मानेचा जवळचा संबंध होता. त्यामुळे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करताना सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सुद्धा चौकशी करावी. कदाचित या कनेक्शनमधूनच माने यांच्यावर कोणी मेहेरनजर दाखवली होती का? व त्यापोटी त्यांनी काही अन्य कृत्ये केली होती का? हे देखील उघड होईल", असे भातखळकर म्हणाले.