

Dombivli Poll Violence BJP And Shinde Sena Candidates Injured In Clash
Esakal
Kalyan Dombivli Municipal Corporation: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज मंगळवारी थंडावणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अनेक ठिकाणी धक्कादायक घटनाही समोर आल्या आहेत. कल्याण डोंबिवलीत मतदारांना पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप होत आहे. भाजपच्या उमेदवारांवर शिवसेना शिंदे गटाने केलेल्या आरोपानंतर दोन्ही गट सोमवारी रात्री उशिरा आमने-सामने आले. यातून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात दोन्ही पक्षाचे उमेदवार जखमी झाले आहेत.