

BMC Politics BJP Sena Avoid Last Minute Risk For Power
Esakal
मुंबई, ता. २७ : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना पक्षाच्या महायुतीने एकत्रित गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती आहे. महायुतीला मुंबईत काठावरचे बहुमत असल्याने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने स्वतंत्र गटाची नोंदणी केल्यास महापालिकेतील महायुतीची सत्ता कायम डळमळीत राहण्याची भिती असल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला आहे.