उद्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज ठाकरेंची घेणार भेट

पुढच्यावर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
Raj-Thackeray
Raj-Thackeraygoogle

मुंबई: पुढच्या काही दिवसात राज्यात नवीन समीकरण आकाराला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमधून तसे संकेतही मिळत आहेत. कधी काळ परस्परांचे चांगले मित्र असलेले शिवसेना-भाजपा (shivsena-bjp) आज परस्परांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत (congress-ncp) शिवसेनेने सरकार स्थापन केल्यापासून या दोन पक्षांमधील दुरावा प्रचंड वाढला आहे. काहीही करुन पुढच्यावर्षी होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायची हेच दोन्ही पक्षांचे लक्ष्य आहे.

अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर असलेली एकहाती सत्ता कायम राखण्याचे शिवसेनेसमोर आव्हान आहे, तर भाजपाला मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकावयाचा आहे. त्या दृष्टीने मागच्या काही दिवसांपासून भाजपाकडून रणनितीक पावलं टाकली जात आहेत.

Raj-Thackeray
ठाणे पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील हॉटेलही बंद ठेवण्याचा इशारा

उद्या सकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Bjp state president chandrakant patil) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांची भेट घेणार आहेत. सकाळी ११.३० वाजता ही भेट होणार असल्याची माहिती आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या (bmc election) पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Raj-Thackeray
...अन्यथा दरमहा 15 हजार रुपये भत्ता द्या, रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

शिवसेनेसोबत युती तोडल्यापासून भाजपा आणि मनसे जवळ येत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपा-मनसे आघाडी करु शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पुण्यातही चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांना भेटणार असल्याचं सांगितलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com