ठाणे पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील हॉटेलही बंद ठेवण्याचा इशारा

hotel closed
hotel closedsakal media

डोंबिवली - दुकानांना रात्री 10 पर्यंत व्यवसाय करण्याची मुभा (shop permission in night) देण्यात आली असताना हॉटेल व्यावसायिकांना (Hotel traders) मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. यावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी दर्शविली असून ठाणे (thane) पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली (Kalyan -Dombivali) तील हॉटेल व्यवसायिकांनीही वेळ वाढवून न दिल्यास हॉटेल्स बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. (shop permission in night-hotel traders-kalyan -dombivali-thane-nss91)

कोरोनाचा प्रदूर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने काही जिल्ह्यातील कोविड निर्बंध शिथिल केले आहेत. दुकानांवरील निर्बंध हटवित त्यांना रात्री 10 पर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे, तसेच शनिवारीही त्यांना मुभा देण्यात आली आहे. दुकानदारांना वेळ वाढवून दिल्यानंतर हॉटेल्स चालकांना का नाही असा सवाल ते उपस्थित करीत आहेत. वेळ वाढवून न दिल्यास ठाणे हॉटेल्स व्यावसायिकांनी हॉटेल्स बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

hotel closed
माॅल आणि हाॅटेल बंद ठेऊन सरकार कोविडचा संसर्ग कसा रोखणार ? व्यापाऱ्यांचा सवाल

त्या पाठोपाठ आता कल्याण डोंबिवलीतील हॉटेल्स व्यवसायिकांनीही हॉटेल्स बंद चा इशारा दिला आहे. गेल्या दिड वर्षांपासून आम्हीही सर्व जण आर्थिक संकटात सापडलो आहोत. कोरोना नियमांचे पूर्ण पालन करीत असतानाही आम्हाला वेळ का वाढवून देण्यात आली नाही. आम्हालाही दुकानदारांप्रमाणे वेळ वाढवून देण्याची मागणी हॉटेल्स व्यावसायिकांनी केली आहे.

हॉटेल्स व्यावसायिकांना 4 पर्यंत वेळ कायम ठेवण्यात आली आहे. मात्र आमचे ग्राहक हे सायंकाळी 7 नंतर येणारे असून दुपारी 4 पर्यंत आमचा 10 टक्केही व्यवसाय होत नाही. पार्सलवर हॉटेल व्यवसाय चालत नसून आमचाही विचार सरकारने करायला हवा.

सचिन शेट्टी, हॉटेल व्यावसायिक, डोंबिवली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com