राजकीय संघर्षाचा ठाण्यात शिमगा; नोटिशीची दहा ठिकाणी होळी करून आंदोलन

BJP Party strike
BJP Party strikesakal media

ठाणे : चौकशीचा ससेमिरा आणि आरोप-प्रत्यारोपांची सत्ताधारी विरोधकांमध्ये धुळवड सुरू असताना ठाण्यातही भाजप व राष्ट्रवादीचा (bjp and ncp) शिमगा पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांची मुंबई पोलिसांकडून (Mumbai police) चौकशी सुरू आहे. ठाणे भाजपकडून फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची दहा ठिकाणी होळी करून आंदोलन (strike) करण्यात आले; तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे व माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची फिर्याद राष्ट्रवादीने पोलिस ठाण्यात नोंदवली.

BJP Party strike
अलिबाग : डंपिग ग्राऊंड , कचरा मुक्तीसाठी रायगड जिल्हा परिषदेचा पुढाकार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची फोन टॅपिंगसह अन्य दोन प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली होती. फडणवीस यांना रविवारी दोन तास चौकशीला सामोरे जावे लागले. ठाकरे सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत निषेध नोंदवण्यासाठी ठाण्यात आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कासारवडवली, वागळे इस्टेट, पोखरण रोड नं. २, कळवा, मुंब्रा, दिवा आदींसह १० ठिकाणी आंदोलन करून फडणवीस यांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटिशींची होळी करण्यात आली. कासारवडवली येथील आंदोलनानंतर माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

भाजपकडून ठाण्यात आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादीनेही आक्रमक पवित्रा घेत थेट नौपाडा पोलिस ठाणे गाठले. भाजप आमदार नितेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा दाऊदशी संबंध जोडणारे विधान केले होते. त्याविरोधात मोर्चा काढत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी फिर्याद दिली. नितेश राणे व नीलेश राणे यांनी टीका करताना आधी आपली उंची तपासावी, त्यानंतरच सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सुनावले.

पुन्हा पेनड्राईव्ह चर्चेत

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या १२५ तासांच्या पेनड्राईव्ह बॉम्बची चर्चा असताना राष्ट्रवादीनेही ठाणे पोलिसांना पेनड्राईव्ह दिल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. नितेश व नीलेश राणे यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व आक्षेपार्ह विधान, मुलाखती, ट्विटरची या पेनड्राईव्हमध्ये माहिती असून पुरावा म्हणून ते पोलिसांकडे सादर केले असल्याचे यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com