

BJP To Lead BMC Mayor Office Shinde Sena Asked To Step Back
Esakal
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीनं बहुमत मिळवल्यानंतर आता महापौरपदाचा पेच निर्माण झाला आहे. भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं २९ जागा जिंकल्या आहेत. बहुमताचा ११४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेला सोबत घ्यावंच लागणार आहे. यामुळे शिवसेनेकडून अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी केली जात आहे. याशिवाय स्थायी आणि इतर समित्यांमध्येही स्थान मिळावं अशी मागणी असल्याचं म्हटलं जात आहे.