Congress
विनोद राऊत
मुंबई : महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे प्रचार सभांनाही मोठी रंगत येणार आहे. त्यातच भाजप यावेळी हैदराबाद पॅटर्ननुसार पक्षाचे सर्व स्टार प्रचारक मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, प्रचाराच्या धामधुमीपासून काँग्रेस नेतृत्व मात्र अलिप्त राहणार असल्याचे कळते. भाजपचा फायदा होईल असे कोणतेही पाऊल उचलायचे नाही, हीच त्यामागील रणनीती असल्याचे सांगण्यात येते.