esakal | भाजपचे 'सेल्फी विथ खड्डा' आंदोलनात लाठीमार झाल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal

भाजपचे 'सेल्फी विथ खड्डा' आंदोलनात लाठीमार झाल्याचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील (Mumbai) रस्त्यांची खड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. या खड्यांवरून आता मुंबईतील विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भाजपने (BJP) आज मुंबईत विविध ठिकाणी 'सेल्फी विथ खड्डा' आंदोलन केले.

महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने भाजप शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मुंबईतील रस्त्यांवरील खड्यांचा प्रश्न भाजपने उचलून धरला आहे. दरम्यान, अंधेरी एमआयडीसी येथे सुरू असलेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप भाजपने केला. त्यात काही कार्यकर्ते जखमी झाल्याचेही भाजपचे म्हणणे आहे. तसेच भाजपने काही भागात खड्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरवले.

हेही वाचा: 'भाजपने परमबीर सिंह यांना विदेशात पाठवले', पटोलेंचा गंभीर आरोप

पालिकेच्या मुख्यालयासमोरील आंदोलनाला माजी मंत्री अॅड. आशीष शेलार, माजी आमदार राज पुरोहित, नगरसेवक आकाश पुरोहित हेही उपस्थित होते. खड्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्याची वेळ येणे अत्यंत वाईट आहे. मात्र, मुंबईतील परिस्थिती काय आहे हे दाखवावे लागले, असा टोला शेलार यांनी लगावला.

loading image
go to top