Bomb Threat : बीकेसी परिसरात वाहनात बॉम्ब ठेवल्याचा फोन; आरोपी अटकेत

मुंबईत घातपाताची धमकी देण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे. बीकेसीमधील एमएमआरडीए इमारतीत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे.
Crime
Crimeesakal

मुंबई - मुंबईत घातपाताची धमकी देण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे. बीकेसीमधील एमएमआरडीए इमारतीत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. आरोपी तरुणाची मानसिक स्थिती बिघडल्याने कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबईतील बिकेसीतील एमएमआरडीए इमारतीत घातपात करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने संपर्क केला. फोन कॉल वर बीकेसी परिसरातील एमएमआरडीए इमारतीत एका वाहनात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.

त्यानंतर तातडीने बॉम्ब शोधक पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. झाडाझडती नंतर पोलिसाना काहीच सापडले नाही. त्यानंतर बीकेसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून तरुण मानसिक रुग्ण असल्याचे तपासात समोर आले आहे.

अफवेच्या वाढत्या घटना

मुंबई पोलिसांना यावर्षी 8 महिन्यात 80 हून अधिक खोटी माहिती देणारे अथवा अफवा/धमकीचे कॉल आले आहेत.तसेच ग्रँट रोड भागातील एका महिलेने 38 वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता. गेल्या आठवड्यात मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी 112 क्रमांकाच्या हेल्पलाईनला आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली.

निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची इच्छा केली व्यक्त केली. त्यांच्याशी बोलू दिले नाही तर बॅाम्बने मंत्रालय उडवून देण्याची दिली धमकी दिली. त्यानंतर पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच दक्षिण मुंबईतील एका महिलेने 38 वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com