युरिया विक्रीत काळाबाजार ; 4 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित 

युरिया.j
युरिया.j

विक्रमगड, ः युरिया खताचा काळा बाजार केल्याप्रकरणी विक्रमगड तालुक्‍यातील 4 कृषी सेवा केंद्रांवर तालुका कृषी कार्यालयाने कारवाई केली आहे. पुढील 15 दिवसांसाठी दोषी कृषी केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच बेहिशेबी युरियाच्या विक्री प्रकरणाची चौकशी तालुका कृषी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. 


विक्रमगड तालुक्‍यातील दादडे येथील चंद्रकांत कृषी सेवा केंद्र, आलोंडा येथील अष्टविनायक कृषी सेवा केंद्र, विक्रमगड शहरातील भरत आग्रो सेंटर , सिद्धी कृषी सेवा केंद्र या चार कृषी सेवा केद्रांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आर. यू.ईभाड यांनी दिली. 
युरिया खताच्या वाटपाच्या नोंदी संगणकावर घेण्यात येत असून पॉस ( POS) मशीन आणि आधार कार्डच्या सहाय्याने शेतकऱ्यांना पक्के बिल देण्याचे राज्य सरकारतर्फे कृषी केंद्रांना बंधनकारक करण्यात आले आहे.

मात्र अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये एका शेतकऱ्याच्या नावे जास्तीची खत विक्री दाखवून सदर खताचा काळा बाजार केला जात असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाच्या निदर्शनात आले. या प्रकरणात चौकशी करून वाटप करण्यात आलेल्या खताच्या पावत्यांचा मेळही जुळत नसल्याचे दिसून आले. या प्रकरणाचा अधिक तपास विक्रमगड तालुका कृषी कार्यालयातून करण्यात येणार आहे. 

 
शेतकऱ्यांना वेळेवर युरिया खत उपलब्ध होत नाही. ही दर वर्षांची बाब असून अशा प्रकारे खतविक्रीचा गैरप्रकार होत असेल, तर ही निश्‍चित गंभीर बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी कृषी केंद्रांवर कडक कारवाई करण्यात यावी. 
- केदार विलास नाईक, शेतकरी, विक्रमगड 

( संपादन ः रोशन मोरे)

 Black market for sale of urea fertilizer in Vikramgad 4 agricultural service centers suspended

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com