मुंबईतही रक्त संकलनाला ब्रेक, कोरोनामुळे मुंबईत रक्ताचा तुटवडा..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

कोरोना प्रादुर्भावाचा फटका मुंबईतील रक्तपेढ्यांना बसला असून, रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जमावबंदी लागू झाल्याने रक्तदान शिबिरे घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या धास्तीने नागरिक रक्तदान करण्यास तयार नसल्याचे रक्तपेढ्यांच्या प्रमुखांनी सांगितले.

मुंबई : कोरोना प्रादुर्भावाचा फटका मुंबईतील रक्तपेढ्यांना बसला असून, रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जमावबंदी लागू झाल्याने रक्तदान शिबिरे घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या धास्तीने नागरिक रक्तदान करण्यास तयार नसल्याचे रक्तपेढ्यांच्या प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा शक्‍य होणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

ही बातमी वाचली का?  भीतीचे कारण नाही; एपीएमसीत आहे... या जीवनावश्यक साधनांचा मुबलक साठा

मुंबईतील काही रुग्णालयांच्या रक्तपेढ्या आहेत. त्याचप्रमाणे खासगी रक्तपेढ्यांमधून रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा केला जातो. रक्तदान शिबिरे व वैयक्तिक रक्तदात्यांच्या माध्यमातून रक्तपेढ्यांमध्ये रक्त, प्लेटलेट आणि प्लाझ्मा यांचे संकलन केले जाते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर रक्तदान शिबिरे घेण्यावर बंदी आल्याने दररोजचे रक्तसंकलन पूर्णतः बंद झाले आहे.

  • मुंबईतील स्थिती- 15 ते 20 टक्के
  • रक्तसाठा - 10 ते 12 (दिवस पुरेल इतकाच)
  • प्लेटलेट साठा ०० 

ही बातमी वाचली का? संजय राऊत म्हणतात, त्या सगळ्यांना क्वारंटाईन करा...

रक्तदान केल्यामुळे कोरोना संसर्गाचा कोणताही धोका नाही. कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे.
- डॉ. पार्थिव संघवी, सचिव, आयएमए.

रक्तदान शिबिरांवर बंदी असली, तरी नागरिक वैयक्तिकपणे रक्तदान करू शकतात. त्यामुळे भीती न बाळगता नागरिकांनी रक्तदान करावे.
- भीमराव काळे, पल्लवी ब्लड बॅंक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blood shortage in mumbai due to corona