esakal | रक्तदान करा ! मुंबईत रक्ताचा तुडवडा, फक्त साडेतीन हजार युनिट एवढाच रक्तसाठा
sakal

बोलून बातमी शोधा

Blood-Donation

रक्तदान करा ! मुंबईत रक्ताचा तुडवडा, फक्त साडेतीन हजार युनिट एवढाच रक्तसाठा

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबई हळूहळू अनलॉक (Unlock Mumbai) होत असताना आता अनेक रुग्णालयेही पू्र्वपदावर येत आहेत. ज्यामुळे, रुग्णालयातील (Hospital)  शस्त्रक्रियांचे प्रमाण ही वाढले आहे. या दरम्यान, मुंबईला बऱ्याच रक्तसाठ्याची (Blood) गरज भासते. पण, गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे (Blood Donation) प्रमाण कमी झाले असून आता रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. आताच्या घडीला मुंबईत फक्त साडेतीन हजार युनिट एवढा रक्तसाठा (Blood Stock) शिल्लक आहे. जो किमान चार ते पाच दिवस पुरेल एवढा असेल. पण, नागरिकांनी रक्तदान (People Blood donation) करुन हा तुटवडा भरुन काढावा असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे.  ( Blood stock in Mumbai very less blood donators come forward mumbai need blood-nss91)

मुंबईतील सर्व रुग्णालयांना मिळून दररोज 800 युनिट रक्त पुरवले जाते. त्यामुळे, सर्व रुग्णालयांमधून आता रक्ताची मागणी वाढली असल्याने रक्तदान शिबिरे भरवण्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेने आवाहन केले आहे. लसीकरण मोहिमेमुळे रक्तदानास अडथळा निर्माण झाला आहे. ज्या लोकांना लस दिली जाते ते 14 दिवसांपर्यंत रक्तदान करू शकत नाहीत. तसेच रक्त साठवणुक करण्यात ही मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच कोविडमध्ये बंद झालेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने मुंबईत रक्ताची मागणी वाढली आहे.

हेही वाचा: राजकुमार हिरानीचा मुलगा असल्याची बतावणी, इंन्स्टाग्रामवरुन फसवणूक

कोविडचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रक्तदासाठी पुढे न येणाऱ्या नागरिकांमुळे काही दिवस शस्त्रक्रिया बंद असतानाही काही काळ रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र आरोग्ययंत्रणेसह विविध सामाजिक संस्थांनी केलेल्या प्रयत्नांमुळे रक्ताची उपलब्धता झाली होती. मात्र गरज वाढल्याने उपलब्ध रक्तसाठा आता अपूरा पडला आहे. सध्या सरकारी पतपेढ्यांमध्ये सर्वात कमी रक्ताची उपलब्धता आहे. पालिकेच्या प्रमुख रूग्णालयांमध्येही रक्ताचा साठा अपुरा आहे. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात देखील  रक्ताचा तुटवटा निर्माण झाला होता. मात्र त्यावेळी अनेक शस्त्रक्रिया देखील थांबवण्यात आल्या होत्या. केवळ महत्वाच्या शस्त्रक्रीया त्यावेळी केल्या जात होत्या. त्यासाठी लागणारे रक्त उपलब्ध व्हावे यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने सामाजिक संस्था तसेच रक्तपेढ्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला राज्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर मात्र नागरिक सतत रक्तदान करत नसल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण होतो.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या सांगण्याहून तसेच प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने नेत्यांच्या वाढदिवसादिवशी रक्तदान शिबिर घेतात. मात्र रक्ताचे आयुष्य केवळ 35 दिवस असते. त्यामुळे दर तीन महिन्याने रक्तदान करावे. ठराविक काळाने सोसायटीच्या आवारात, कार्यालयात रक्तदान शिबिर घ्यावे असे  राज्य रक्त संक्रमण परिषद सहसंचालक डॉ.अरुण थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबईत उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा वाद, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

रक्तदात्यांनो रक्तदानासाठी पुढे या

मुंबईत दररोज साधारण 800 युनिट पर्यंत रक्त रुग्णालयांमध्ये लागते. सध्या 4 ते 5 दिवस पुरेल इतका रक्तसाठा असला तरी रक्ताचा तुटवडा आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र आवश्यकतेनुसार रक्त उपलब्ध करण्यात येत आहे. कोरोनामुळे रक्तपेढ्याकडून होणारी रक्तदान शिबिरे कमी झाली आहेत शिवाय रक्तदाते ही रक्तदानासाठी फारसे पुढे यात नाहीत. त्यामुळे छोट्या रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिरे आयजित करावे तसेच रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन डॉ. थोरात त्यांनी केले आहे.

रक्ताची उपलब्धता

रक्तपेढी -      युनिट   

सायन -         17

सेंट जॉर्जेस -  79

ऩायर -         76

राजावाडी -     63

जीटी -         17

केईएम -       79

जेजे -           141   

loading image