
Rajan Salvi Resign from Thackera ShivSena: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. कारण साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. तसंच उद्या ते शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळं फोडाफोडीच्या राजकारणाचा आणखी एक अकं आता पाहायला मिळणार आहे.