

BMC Alert Mode
ESakal
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकणी शाळांना सुट्टी देण्यात आली असून खाजगी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईतील पावसाच्या अतिवृष्टीवर मुंबई महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे. बांधकाम स्थळांसह नागरिकांना महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.