कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरं जाण्यास मुंबई सज्ज ! पण लोकहो उगाचचा शहाणपणा नको

सुमित बागुल
Saturday, 21 November 2020

एकीकडे अनेक युरोपीय देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. इथे भारतात देखील राजधानी दिल्लीमधील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी भीषण आहे

मुंबई : एकीकडे अनेक युरोपीय देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. इथे भारतात देखील राजधानी दिल्लीमधील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी भीषण आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीत देखील कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय का अशी चिंता व्यक्त केली जातेय. याला कारण ठरतंय कोरोनाचा वाढता आकडा. गेले अनेक महिने खाली येणारा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा वाढतोय. मुंबईत दररोज नोंदवली जाणारी कोरोना रुग्णसंख्या ५०० च्या खाली गेली होती ती पुन्हा नऊशेच्या वर जाऊन हजाराकडे वाटचाल करतेय. अशात येत्या काही दिवसात पडणारी थंडी आणि नुकतीच साजरी झालेली दिवाळी यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 

मात्र, दिल्लीप्रमाणे वाढणारी रुग्णसंख्या किंवा इतर कोणत्याही युरोपीय देशाप्रमाणे मुंबईतील कोरोनाची दुसरी लाट प्रशासनाला आणि मुंबईकरांना देखील परवडणारी नाही. स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील महाराष्ट्रात, मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली तर आपल्याला महागात पडेल असं विधान केलाय. अशात मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलीच तर मुंबई त्यासाठी किती तयार आहे याचा आढाव या बातमीतून घेऊयात. 

महत्त्वाची बातमी : राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या यादीवर भगतसिंह कोश्यारी यांचं अजूनही मौन, सरकार उचलणार मोठं पाऊल ?

  • मुंबईत कोरोना रुग्णांसाठीचे तब्बल १३ हजार बेड्स रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात ICU बेड्स देखील रिक्त आहेत. 
  • कुठेही ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटर्सची कमी पडणार नाही याची खबरदारी मुंबई महापालिकेने घेतली आहे.
  • या आधी सर्व ठिकाणी सिलिंडरच्या साहाय्याने ऑक्सिजन पुरवठा केला जात होता. आता टर्बो ऑक्सिजन फॅसिलिटीद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.
  • कोरोनाची दुर्दैवी दुसरी लाट आलीच तर गरज पडल्यास राखीव कोविड सेंटर टप्प्याटप्याने सुरु करता येतील.
  • कोणतंही कोविड सेंटर डिसेंबरपर्यंत बंद करण्यात येणार नाही 
  • सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड सेंटर्सला औषधांची कमतरता पडू दिली जाणार नाही असंही महापालिकेकडून सांगण्यात येतंय. 
  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेली गर्दी पाहता सातत्याने नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. यामध्ये फेरीवाले, रिक्षा, बस मधील चालक आणि वाहक, दुकानदार हॉटेलमध्ये काम करणारे यांचा समावेश आहे. 
  • गरज पडल्यास मुंबईत येणाऱ्या ट्रेन्स बंद केल्या जाऊ शकतात. मुंबईतील लोकल ट्रेन्स सर्वसामान्य पुरुष नागरिकांसाठी तूर्तास सुरु होणार नाहीत. 
  • मुंबईतील आणि मुंबई महानगरातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार

महत्त्वाची बातमी :  मुंबईकरांनो पुढील चार आठवडे धोक्याचे ! मुंबईत पुन्हा लॉकडाऊन ? आयुक्त इकबाल सिंह चहल यांचं सूचक विधान

मुंबईकरांनो कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरं जाण्यास मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग जरी तयार असला तरी उगाचचा शहाणपणा नको. सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हायलाच हवे आणि मास्क वापरायलाच हवा.   

BMC and health department is all set to face second wave of covid in mumbai if it occurs 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC and health department is all set to face second wave of covid in mumbai if it occurs