मुंबईकरांनो पुढील चार आठवडे धोक्याचे ! मुंबईत पुन्हा लॉकडाऊन ? आयुक्त इकबाल सिंह चहल यांचं सूचक विधान

मुंबईकरांनो पुढील चार आठवडे धोक्याचे ! मुंबईत पुन्हा लॉकडाऊन ? आयुक्त इकबाल सिंह चहल यांचं सूचक विधान

मुंबई : दिवाळीचा काळ कोरोनावर्धक ठरल्याचं समोर येणाऱ्या आकडेवारीनुसार पाहायला मिळतंय. प्रशासनाकडून वारंवार सांगितलं गेलं, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळा, तोंडावर मास्क लावा. मात्र अनेकांनी प्रशासनाच्या या सूचना पद्धतशीर दुर्लक्षित केल्यात. ज्याची परिणीती कोरोना आकडा वाढताना पाहायला मिळतेय. एकीकडे दिल्लीत जसा कोरोनाचा भयंकर उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे तशीच मुंबईची देखील कोरोना परिस्थिती गंभीर होत असल्याचे समोर येतंय.    

मुंबईत वाढलेल्या कोरोना रुग्णाची आकडेवारी पाहता मुंबईचे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईची लाईफलाईन लोकलबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलंय. मुंबईसाठी पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे असून सर्वसामान्यासाठी लोकल सेवा तुर्तास सुरू करता येणार नाही असं इकबाल सिंह चहल म्हणालेत. 

एका इंग्रजी वृत्तसमूहाला इकबाल सिंह चहल यांनी मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये आयुक्तांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.  पुढील चार आठवडे आपण मुंबईत कोणतेही निर्बंध घालणार नाही. मात्र या चार आठवडयानंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर गरजेचे असल्यास कठोर निर्बंध पुन्हा लादले जाऊ शकतात, असं इकबाल सिंह चहल म्हणालेत. मुंबईतील वाढती कोरोनाची आकडेवारी चिंताजनक असल्याचं मतही चहल यांनी व्यक्त केलीये.   

दिवाळीनंतर मुंबईसह राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून  घेण्यात आलेला. तसेच मुंबईतील लोकल ट्रेन्स या देखील सर्वसामान्य पुरुष नागरिकांसाठी खुल्या कराव्यात आसा प्रस्ताव देखील राज्य सरकारने रेल्वेकडे मांडला आहे. अशात कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता मुंबई आणि ठाण्यातील शाळा या आता थेट पुढील वर्षीच खुल्या होणार आहेत. दम्यान मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईच्या लोकल ट्रेन्स या देखील तूर्तास सुरु होणार नसल्याचं चहल म्हणालेत. 

दिवाळीनंतर महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, दिल्ली आणि केरळमध्ये कोरोनाची परिस्थिती संवेदनशील झालीये.

next four months will be very crucial for mumbai says iqbal singh chahal commissioner of BMC

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com