मुंबई आणि उपनगरांतील शासकीय कार्यालयांना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर

मुंबई आणि उपनगरांतील शासकीय कार्यालयांना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर

मुंबईः सोमवारी रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांतील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. मदत आणि पुनर्वसन विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा मात्र सुरूच राहणार आहेत.

पावसाचा फटका रेल्वेच्या अत्यावश्यक सेवेवर

मुसळधार पावसामूळे रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प झाली. यामध्ये अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवा सुद्धा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावर परळ, माझगांव, सायन रेल्वे मार्गांवर पाणि साचलं आहे. हार्बर रेल्वे मार्गावर वडाळा, चेंबुर येथे रुळावर पाणी साचलं आहे. त्यासह पश्चिम रेल्वे मार्गावर दादर, प्रभादेवी पाणी साचल्याने या सर्व मार्गांवरील चर्चगेट, सीएसएमटीच्या दिशेनं येणारी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी धावणारी लोकल सेवा बंद करण्यात आलीय.

त्यासोबतच पश्चिम, मध्य आणि हार्बर या मार्गांवर पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवा ठप्प झाली आहे. 

मुंबई महापालिकेचं आवाहन

अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आलं. आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलं. त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरातच थांबण्याचे आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आलं.

(संपादनः पूजा विचारे)

BMC announced all offices other establishments will remain closed today except emergency services

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com