आशियाई महिला फुटबॉल स्पर्धा; दुरुस्तीच्या खर्चाला स्थायी समितीची मंजूरी

क्रिडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी ६० लाख
football sports
football sportssakal media

मुंबई : आशियाई महिला फुटबॉल स्पर्धा (Asian woman football competition) मुंबईतील (Mumbai) अंधेरी येथील शहाजी राजे भोसले क्रिडा संकुलात (sports complex) होणार आहे. या स्पर्धेसाठी रंगरंगोटीसह दुरुस्तीसाठी ६० लाख रुपयांचा खर्च (60 lac repairing expenses) करण्यात येणार आहे. या खर्चाला आज स्थायी समितीने (bmc) मंजूरी दिली आहे.

football sports
BMC : मुंबईत उद्या फक्त 39 केंद्रांवर लसीकरण; उर्वरित ठिकाणी मोहीम बंद

आशियाई महिला करंडक फूटबॉल स्पर्धा १७ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२२ दरम्यान अंधेरीतील क्रिडा संकुलात होणार आहे. लॉकडाऊन मुळे हे क्रिडा संकुलन वापरत नसल्याने डागडुजी,रंगरंगोटी तसेच इतर कामे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी ६० लाख रुपयांच्या खर्चाला मंजूरी मिळण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता.मात्र, हा प्रस्ताव विलंबाने आल्याने तो राखून ठेवावा अशी मागणी भाजपने केली.आशियाई स्पर्धा होत असल्याने त्यांची तयारी करणे गरजेचे आहे.त्यामुळे हा प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सदस्यांना केली.त्यांच्या आवहानानुसार हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

विजेच्या वाढीव खर्चासाठी १५ लाख

प्लंबिंग रंगरंगोटी तसेच इतर दुरुस्तीसाठी १६ लाख ५०० रुपयांचा खर्च करणार आहे.तर,अतिरिक्त चार उच्च क्षमतेचे प्रकार झोत असलेले दिवे (हायमास्ट)तसेच विशिष्ट प्रकारच्या दिव्यांच्या उभारणीसह देखभालीसाठी ३० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.तर,वाढीव विज बिलासाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com