BMC Bonus 2022 : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट; घसघशीत बोनस जाहीर

कालच महापालिका आयुक्त आणि कर्मचारी कामगार सेनेची बैठक पार पडली होती.
bmc election
bmc election sakal

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर असून त्यांना तब्बल २२ हजार ५०० रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. महापालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि बीएमसी कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्यामध्ये बुधवारी बोनसबाबत बैठक झाली, यावेळी हा महत्वपूर्ण निर्णय झाला. (BMC Bonus Diwali gift to Mumbai Municipal Corporation employees bonus announced)

या बैठकीत युनियनने कामगारांचे विविध मुद्दे मांडले. यावेळी कर्मचाऱ्यांना २० ते २५ हजार रुपयांचा बोनस मिळावा अशी मागणी यावेळी युनियनकडून करण्यात आली होती. पण या बोनसबाबत मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देऊन चर्चा करण्यात येईल, असं आश्वासन आयुक्तांनी युनियनला दिलं होतं.

bmc election
Rahul Gandhi : पटोलेंकडून राहुल गांधीची तुलना श्रीरामाशी; म्हणाले, दोघेही राजकुमार...

दरम्यान, कमाल २५ हजार रुपयांच्या बोनसची मागणी मान्य झाली नसली तरी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुवर्णमध्य साधला आहे. त्यानुसार २२,५०० रुपयांचा बोनस प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी जाहीर करण्यात आला आहे.

bmc election
Russia-Ukrain: रशियाची मोठी घोषणा; उद्या युक्रेनचे 4 प्रदेश अधिकृतरित्या रशियाला जोडणार

मुंबई महापालिकेत सध्या साडेचारशे कंत्राटी कामगार असून त्यांना बोनस लागू होत नाही. पण मुंबई महापालिकेशिवाय इतर महापालिकांमधील कंत्राटी कामगारांना मात्र बोनस दिला जातो, या धर्तीवर बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना देखील बोनस मिळावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com