Mumbai News: मुंबईचा विकास रखडला? बीएमसी बजेटपैकी ४८% निधी अजूनही प्रलंबित, खर्चाचे आकडे समोर

Mumbai News: २०२५-२६ च्या बीएमसी अर्थसंकल्पातील धक्कादायक खर्चाचे आकडे समोर आले आहेत. जानेवारीपर्यंत एकूण अर्थसंकल्पाच्या फक्त ५२% खर्च झाला होता. अनेक प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत.
BMC Budget 2025-26

BMC Budget 2025-26

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या नागरी सुविधांसाठी ४३ हजार १६२ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली; मात्र आर्थिक वर्ष संपायला आता एक महिना शिल्लक असताना यातील केवळ ५१ टक्केच निधी प्रत्यक्षात खर्च झाल्याचे समोर आले आहे. प्रशासकीय राजवटीत नियोजनाचा अभाव आणि निविदा प्रक्रियेतील दिरंगाईमुळे मुंबईच्या विकासाला ‘ब्रेक’ लागला असून, हजारो कोटी रुपये अद्याप पालिकेच्या तिजोरीतच पडून आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com