

BMC
Esakal
मुंबई : पाणीपट्टीत वाढ होणार का, पाण्याच्या बिलात किती वाढ होणार, अशा सर्व प्रश्नांची प्रशासनाने नीट उत्तर द्यावे, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे केली. दरम्यान, पाणीपट्टीत वाढ करण्याबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी (ता. २४) दिले. दरम्यान, आठ टक्के दरवाढ केलेली नाही. आढावा घेत निवेदन केले पाहिजे, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.