bmc
Esakal
मुंबई : मुंबईची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत आणि आधुनिक करण्यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. पालिकेचे मुख्यालय तसेच मुंबईतील इतर वर्दळीच्या आणि संवेदनशील ठिकाणांवरील सर्व्हिलन्स सिस्टीम (पाळत ठेवण्याच्या यंत्रणेचे) अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, यासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.