

Hospital Rules
ESakal
रुग्णालये आणि पालिका कार्यालयांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी बीएमसीने कडक उपाययोजना करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रस्तावित नियमांनुसार, पान, गुटखा किंवा तंबाखूचे सेवन करणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येईल. रुग्णालये आणि पालिका कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारावर लोकांची तपासणी केली जाईल. याशिवाय, तंबाखू ओढताना किंवा गुटखा खाताना आढळलेल्या कोणालाही प्रवेश नाकारला जाऊ शकतो.