

Midnight Administrative Activity at BMC Raises Serious Questions
Esakal
Maharashtra Politics: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा सोमवारी करण्यात आली. यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली पण पहिल्याच दिवशी बीएमसी कार्यालयात आचारसंहितेचा भंग झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. सचिव कार्यालयात प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया रात्रभर सुरू होती. हे काम दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहा वाजता बंद झाले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.