

Mumbai “sold” controversy
ESakal
मुंबई विकली जात असल्याचा आरोप गेल्या काही काळापासून राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. विशेषतः बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मोठे प्रकल्प, कॉर्पोरेट समूह, पुनर्विकास योजना आणि निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता यावरून हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवाजी पार्कवरील संयुक्त सभेत ठाकरे बंधुंनी हा मुद्दा अग्रस्थानी ठेवला होता. त्यांनी मुंबई विकली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच अनेक भुखंड अदानींकडे जात असल्याचे सांगितले आहे. मग खरोखरच मुंबई ‘विकली’ जात आहे का, की हा फक्त राजकीय आरोप आहे? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.