

BMC Election Result Voters Reject Political Dynasties In Mumbai
Esakal
मुंबई महापालिका निवडणुकीच्या २२७ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. काही जागांचे निकाल हाती आले असून यात अनेक धक्कादायक असे निकाल लागले आहेत. मुंबईत अनेक दिग्गजांच्या नातलगांना पराभवाचा धक्का बसलाय. यात शिंदेंच्या दोन शिलेदारांच्या वारसांनाही मतदारांनी नाकारलंय. विद्यमान खासदारांच्या मुलीला तर माजी आमदाराच्या मुलाला पराभवाचा धक्का बसला आहे. गँगस्टर अरुण गवळींची मुलगी गीता गवळी या प्रभाग क्रमांक २१२ मधून मैदानात उतरल्या होत्या. त्यांचा पराभव झाला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि रवींद्र वायकर यांची मुलगी दिप्ती वायकर यांनाही पराभवाचा धक्का बसला.