

BMC Election Vote Counting list
ESakal
मुंबई : राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच शुक्रवार (ता. १६ जानेवारी) रोजी लागला जाणार आहे. यामध्ये सर्वांचं लक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर आहे. मुंबईत २२७ निवडणूक प्रभागांकरिता एकूण २३ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतर्गत अभिरक्षा कक्ष (स्ट्रॉग रूम) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. याबाबतची सर्व यादी समोर आली आहे.