Mumbai News: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेचा अहवाल गुलदस्त्यात, तीन आठवडे उलटले; पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Mumbai Municipal Corporation: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेचा चौकशी अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आला नाही. त्यामुळे मुदत संपूनही अहवाल गुलदस्त्यात असल्याने पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
BMC

BMC

Esakal

Updated on

मुंबई : साकीनाका येथील खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख (वय ५५) यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला तीन आठवडे उलटूनही त्याचा चौकशी अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मुदत संपूनही अहवाल गुलदस्त्यात असल्याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चेंबूर वृक्ष दुर्घटनेप्रमाणे हा अहवाल सभागृहात फेटाळला जाऊन टीकेचे धनी व्हावे लागेल, अशी धास्ती महापालिका प्रशासनाला वाटत असल्याची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com