
मुंबई : मुलुंड (पश्चिम) येथील ‘टी’विभागात येत्या शनिवार, (ता.१९) रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत, तब्बल १२ तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्याचे काम योगी हिल मार्गावरील प्रस्तावित विकास नियोजन रस्त्यावर हाती घेतले जाणार आहे. या कामाचा थेट परिणाम मुलुंड पश्चिमच्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर होणार असून काही भागांमध्ये पूर्णपणे पाणी बंद राहणार आहे.