esakal | मुंबईतील बुजुर्गांची खास तपासणी होणार
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील बुजुर्गांची खास तपासणी होणार

बृहन्मुंबई महापालिकेने वरिष्ठ नागरिकांची खास चाचणी करण्यासाठी मोहीम सुरु करण्याचे ठरवले. प्रामुख्याने काही रोगांना सामोरे जात असलेल्या तसेच झोपडपट्टीतील वृद्ध नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. 

मुंबईतील बुजुर्गांची खास तपासणी होणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई 22 :  बृहन्मुंबई महापालिकेने वरिष्ठ नागरिकांची खास चाचणी करण्यासाठी मोहीम सुरु करण्याचे ठरवले. प्रामुख्याने काही रोगांना सामोरे जात असलेल्या तसेच झोपडपट्टीतील वृद्ध नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. मुंबईत आढळत असलेल्या कोरोना रुग्णात वृ्द्धांचे प्रमाण जास्त आहे. त्यात अनियंत्रित मधूमेह, रक्तदाब, कर्करोग, अस्थमा, मूत्रपिंडांचे विकार तसेच थायरॉईडचा त्रास असलेल्या वृद्धांची सुरुवातीस प्रामुख्याने तपासणी होणार आहे.

त्याचबरोबर त्यांच्यावर उपचारही करण्यात येणार आहेत. भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे तसेच राज्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील झोपडपट्टी विभागातील वृद्धांची सुरुवातीस तपासणी होईल. त्याचबरोबर वृद्धांच्या नातेवाईकांना घरातील बुजुर्गांची काळजी कशी घ्यावी, तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

नवी मुंबईच्या महापे एमआयडीसीतून आली धक्कादायक बातमी; पालिका प्रशासनाची उडाली झोप

मुंबईतील सर्व आरोग्य विभागात वृद्धांचे सर्वेक्षण तसेच तपासणी होणार आहे. महापालिका हे काम करणार आहे. त्यासाठी ते पथके तयार करणार आहेत. त्या पथकात स्वयंसेवकांचाही समावेश असणार आहे. ही पथके त्यांना नेमून दिलेल्या विभागात घरी जाऊन तपासणी करतील. पथक वृद्धांच्या परिस्थितीनुसार त्यांना पालिकेच्या रुग्णालयात तपासणीसाठी पाठवणार आहे. तिथे त्यांची ऑक्सिजन लेवल तपासली जाईल. ती 95 टक्क्यापेक्षा कमी असेल तर त्यांना तातडीने पुढील तपासणीसाठी खास रुग्णालयात पाठवण्यात येईल.

बुजुर्ग नागरीकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसारच ही तपासणी होणार असल्याचे पालिकेच्या आधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image