मुंबईकरांनो कचऱ्यावर प्रक्रिया करा! अन्यथा सोसायट्यांवर कारवाईचा बडगा

मुंबईकरांनो कचऱ्यावर प्रक्रिया करा! अन्यथा सोसायट्यांवर कारवाईचा बडगा


मुंबई  : दिवसाला 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या 1,325 सोसायट्यांमध्ये आजही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. अखेर महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या सोसायट्यांवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. 

घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार, दिवसाला 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांमध्येच कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. महापालिकेने यानुसार 3 हजार 367 सोसायट्यांना नोटीस पाठवली होती. त्यातील 1 हजार 696 सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरण सुरू झाले आहे. मात्र, उर्वरित 1 हजार 325 सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरण केल जात नाही. त्यानुसार पालिकेने आतापर्यंत 48 लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे; मात्र तरीही कचरा वर्गीकरण होऊन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने आता या सोसायट्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती प्रशासनाने स्थापत्य समितीच्या पटलावर मांडली आहे. 

प्रक्रियेमुळे कचरा घटला 
महापालिकेने 2018 पासून कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक केल्यापासून डम्पिंगवर येणारा कचरा कमी झाला आहे. 2018 मध्ये मुंबईत रोज 7 हजार 295 टन कचरा तयार होत होता. ऑक्‍टोबर 2020 हेच प्रमाण 5 हजार 49 मेट्रिक टनवर आले आहे. कचऱ्यावर उगमाच्या ठिकाणीच प्रक्रिया झाल्यास वाहतुकीचा खर्च तर वाचतोच, त्याचबरोबर डम्पिंगवरील ताणही कमी होतो, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com