

BMC
Esakal
मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गंभीर हवामानाचा धोका लक्षात घेऊन महानगरपालिकेने शहरातील सर्व विकासक (बिल्डर्स), वास्तुविशारद, कंत्राटदार आणि प्रकल्प व्यवस्थापकांसाठी अत्यंत महत्त्वाची सुरक्षा नियमावली जारी केली आहे.