

Marathi signboards on shops
ESakal
मुंबई : मुंबईतील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीतील नामफलक लावण्याबाबत मुंबई महानगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्या दुकानांवर अद्याप मराठी पाट्या नाहीत, त्यांना एका महिन्याचा 'अल्टिमेटम' देण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्याचा इशारा उपमहापौर संजय घाडी यांनी बुधवारी दिला.