

BMC Madh-Versova Bridge
ESakal
मुंबई : मढ-वर्सोवा केबल-स्टेड पूल प्रकल्पाच्या बांधकामात लक्षणीय प्रगती झाली आहे. ज्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठी दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. बीएमसी फेब्रुवारी २०२६ मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्याची तयारी करत आहे. सुमारे २,३९५ कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या या पुलाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.