esakal | मराठी शाळांचा पट घटतोय; दहा वर्षात विद्यार्थ्यी संख्या 70 हजाराने घटली | Marathi School
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi school

मराठी शाळांचा पट घटतोय; दहा वर्षात विद्यार्थ्यी संख्या 70 हजाराने घटली

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : महानगरपालिकेच्या (bmc) 130 मराठी शाळांना (marathi school) गेल्या दहा वर्षात टाळे लागले आहे. तर, याच काळात विद्यार्थ्यी संख्याही (students) 1 लाखावरुन 35 हजारांवर आली आहे. तर,दुसऱ्या बाजूला महानगर पालिका इंग्रजी शाळांबरोबर (English school) राज्य बोर्डा व्यतिरीक्त (Maharashtra board) इतर बोर्डाच्या शाळा सुरु करण्यावर भर देत आहे.

हेही वाचा: मुंबईत रूग्ण वाढ राज्यात मात्र घट; महिनाभरात 10 टक्क्यांनी रूग्ण वाढ

महानगर पालिकेने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच,इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरु करण्यात येत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला मराठीसह इतर भाषिक शाळांची संख्या कमी होत आहे. 2010-11 मध्ये पालिकेच्या मराठी शाळांची संख्या 413 होती तर विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख २ हजाराहून अधिक होती.तर,2019-20 या वर्षात शाळांची संख्या 283 पर्यंत खाली आहे.तर,विद्यार्थ्यांची संख्या 35 हजार 181 झाली आहे.दरवर्षीच मराठी शाळांची पटसंख्या दरवर्षीच घटत आहे.अशी माहिती भाजपचे आमदार अमित साटम यांनी महानगर पालिका प्रशासनाकडून मिळवली.

शिवसेनेवर निशाणा

महानगर पालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आल्या पासून गेल्या तीन वर्षात मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला.त्याच बरोबर मराठी शाळांची संख्याही घटत आहे.अशीच परीस्थीती राहील्यास 2027 पर्यंत मुंबईत मराठी शाळाच राहाणार नाहीत अशी परीस्थीती येऊ शकते असा टोला आमदार अमित साटम यांनी लगावला.2013 नंतर आवश्‍यकतेनुसार शिक्षकांची भरती झाली नाही.तर,शाळांना सहा सहा महिने मुख्याध्यपक मिळत नाही अशी परीस्थीती आहे.असे साटम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.

loading image
go to top