devendra fadnavis eknath shinde
esakal
मुंबई
BMC Mayor : भाजप-शिवसेनेचा पेच सुटेना, महापौरपदाची निवड लांबणीवर; फेब्रुवारीत होणार निर्णय
BMC Mayor Election : मुंबईच्या महापौर पदासाठी ३१ जानेवारीला मतदान घेतलं जाणार होतं. पण आता ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येतेय. भाजप आणि शिवसेनेकडून अद्याप गट नोंदणी करण्यात आलेली नाही.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. महापौर पदासाठी ३१ जानेवारीला मतदान घेतलं जाणार होतं. पण आता ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे नव्या महापौरांच्या निवडीला फेब्रुवारीत मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे सेनेकडून अद्याप गटाची नोंदणी कोकण आयुक्तालयाकडे झालेली नाहीय. त्यामुळेच महापौर निवड कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

