

BMC Mayor election turns dramatic with Thackeray and Modi slogans
Esakal
BMC Mayor: मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर या पदांची औपचारिक निवड प्रक्रिया आज होत आहे. विरोधकांकडून दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने महापौर आणि उपमहापौरांच्या नावांची थेट घोषणा होणार आहे. दरम्यान महापौर आणि उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेवेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि भाजपचे इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते. निवड प्रक्रियेवेळी सभागृहात सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि विरोधक असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पहिल्याच दिवशी सभागृह घोषणांनी दणाणून सोडलं.