'त्या' 144 नर्स तीन महिन्यांपासून बिनपगारी ऑन ड्युटी 24 तास

'त्या' 144 नर्स तीन महिन्यांपासून बिनपगारी ऑन ड्युटी 24 तास
Updated on

मुंबईः पालिकेनं मे महिन्यात नियुक्त केलेल्या १४४ तरुण नर्संना अद्याप पगारातील एक रुपया दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच काय तर, कोविड विभागात काम करण्यासाठी मिळणारे रोजचे ३०० रुपये दिले नाहीत. या नर्संना त्यांच्या नोकरीचं स्वरुप, कायमचे (permanent) किंवा करारनामा किंवा त्यांना किती पैसे दिले जाणार आहेत हेदेखील त्यांना सांगितलेलं नाही. शुक्रवारी या नर्सच्या गटानं एफ दक्षिण प्रभागातील बीएमसी कार्यालयावर मोर्चा वळविला आणि कार्यालयात जाऊन निवेदनही दिलं. यातील बहुतेक नर्स २६ ते २८ वयोगटातील आहेत.

पालिकेनं या नर्संना हॉटेल किंवा बीएमसीच्या निवासस्थानी राहण्यास जागा दिली असली तरी बर्‍याच जणांनी सांगितलं की, आम्ही आमच्या कुटूंबाने पाठवलेल्या पैशांवर दिवस काढत आहोत. त्यापैकी दोन नर्स गर्भवती देखील आहे. माझ्या सहकारी सात आणि नऊ महिन्यांच्या गर्भवती असून कोविड वॉर्डमध्ये काम करत आहेत. काही दिवसांनंतर त्या त्यांच्या पती किंवा पालकांना पैशासाठी विचारतात. ही खूप विचित्र गोष्ट असल्याचं, एका नर्सनं म्हटलं आहे. 

मे महिन्यापासून ते दिवसाचे सहा ते आठ तास काम करत आहेत. काही आठवड्यातून पाच दिवस, तर काही जण सहा  दिवस काम करत आहेत. त्यातील काहींनी सांगितले की बीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले होते की ज्यांनी 9 मेपूर्वी कागदपत्रे सादर केली होती त्यांना कायमची नोकरी मिळेल. , जवळजवळ तीन महिन्यांनंतर, 144 पैकी कोणालाही अद्याप माहित नाही की त्यांना कधी पगार दिला जाईल आणि तसंच कधी आणि किती पैसे देण्यात येतील.

म्युनिसिपल मजदूर युनियनचे प्रदीप नारकर यांनी शुक्रवारी परळमधील नर्सेची भेट घेतली आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करण्याचं आश्वासनंही दिलं. मी बीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी बोललो असून लवकरच आम्ही बीएमसीला पत्र लिहू. या नर्संना पूर्ण पगार मिळणं गरजेचं असून त्यासाठी त्या पात्र असल्याचं ते म्हणालेत. पालिकेच्या डॉ मंगला गोमारे म्हणाल्या, मला याबाबत काही कल्पना नव्हती. शुक्रवारी मला या नर्सेसचे प्रतिनिधित्व प्राप्त झाले आणि त्यानंतर मी यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

BMC not paid 144 covid nurses hired May nurses marched office

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com