

BMC
Esakal
मुंबई : चेंबूर येथील दुर्दैवी झाड दुर्घटना, साकीनाका अपघात आणि मुसळधार पावसात शहरात झालेली तुंबई यामुळे महापालिकेच्या कारभारावर उठलेले प्रश्न पाहता, आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रशासकीय यंत्रणेला गती देण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. गुरुवारी (ता. ३०) प्रशासकीय कारवाईचा दणका देत आयुक्तांनी विविध विभाग कार्यालयांतील सहा सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या. तसेच तीन कार्यकारी अभियंत्यांकडे सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला.