esakal | आता झिका व्हायरसचं टेन्शन, BMC अलर्ट मोडवर
sakal

बोलून बातमी शोधा

Zika virus

आता झिका व्हायरसचं टेन्शन, BMC अलर्ट मोडवर

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोना रुग्णसंख्या (Corona patients) आता हळूहळू नियंत्रणात आली आहे. पण, आता झिका व्हायरसचे (Zika Virus) टेंशन मुंबईकरांसह मुंबई पालिकेलाही आहे. केरळ राज्यात (keral) काही गर्भवती महिलांमध्ये (Pregnant Woman) झिका व्हायरसची लक्षणे आढळली आहेत. याच पार्श्वभूमीवर झिका मुंबईतही (Mumbai) पसरु शकतो,अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे, झिकाचा धोका लक्षात घेत मुंबई महापालिका (BMC) सतर्क झाली आहे. (BMC On Alert Mode as Zika virus enters in India)

महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून सर्व वॉर्डच्या अधिकाऱ्यांना या संबंधित सूचना दिल्या आहे. एडिस एजिप्ती या नावाचा डेंगी, चिकनगुनिया, मलेरिया या सारखे आजार पसरवणारा डासच झिका पसरवतो. त्यामुळे, डेंगीसाठी ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत, त्याच झिकासाठीही अवलंबल्या जात आहेत. त्यानुसार, शुक्रवारी सकाळपासूनच सर्व किटकनाशक अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग, तपासण्यांबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे. शिवाय, झिकासाठी मुंबईतील सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट देखील पालिकेकडून देण्यात आला आहे. जर मुंबईत संसर्ग पसरत असेल तर तो तात्काळ नियंत्रित करा असेही आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: करुन दाखवलं! अलिबागमधल्या 'या' गावाने कोरोनावर मिळवला विजय

नागरिकांना आवाहन

दरम्यान, पालिकेकडून नागरिकांना कोणताही ताप अंगावरुन काढू नका, तपासणी करा असे आवाहन करण्यात आले आहे. डेंगीसाठी मान्सूनपूर्वी आणि मान्सूननंतर पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहे. ज्या झिकासाठी ही लागू झाल्या आहेत. पण, डासांपासून मनुष्याला झालेल्या संसर्गाचा प्रसार नियंत्रणात राहणे गरजेचे आहे. त्यामुळे, घराजवळ स्वच्छ पाणी साचणार नाही याची खबरदारी मुंबईकरांनी घेतली पाहिजे.

अगदी साचलेल्या चमचाभर पाण्यातही डासांची उत्पत्तीस्थळे आढळून येतात. हे लक्षात घेऊन आपल्या घरात व घराशेजारच्या परिसरात आणि कार्यालयात व कार्यालया शेजारच्या परिसरात पाणी साचू देऊ नये. अगदी थेंबभर पाणी साचलेले आढळले, तरी देखील तात्काळ नष्ट करावे. साचलेल्या पाण्यात डासाच्या मादीने अंडी घातल्यास त्यातून डास उत्पन्न होण्यास साधारणपणे आठवड्याभराचा कालावधी लागतो. हे लक्षात घेऊन दर आठवड्यातून एक दिवसा आपल्या सोसायटीच्या व जवळपासच्या परिसराची नियमितपणे तपासणी करावी. याचसोबत पाणी साठवण्याची भांडी, टाक्या आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरड्या ठेवाव्यात, असे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे.

" झिका किंवा इतर पावसाळी आजारांसाठी पालिका सज्ज आहे. फक्त नागरिकांनी स्वच्छता पाळावी आणि काळजी घेणे गरजेचे आहे.  पाऊस आणि स्वच्छ पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे स्त्रोत आहे. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती नष्ट करण्यासाठी  360 कर्मचारी कामाला लागले आहेत. हिवाळा सुरू होईपर्यंत अशा पाण्यावर आणि ठिकाणांवर लक्ष ठेवले जाते.  " 

राजन नारिंग्रेकर , महापालिकेचे किटकनाशक अधिकारी

हेही वाचा: भयानक! बक्षीस दिलं नाही, मुंबईत तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या बाळाची केली हत्या

काय आहे 'झिका' व्हायरस ?

झिका व्हायरस हा मच्छरांमार्फत होणारा संसर्ग आहे. गर्भवती महिलांना हा रोग झाल्यास अर्भकांना मायक्रोसेफली हे जन्मजात व्यंग येऊ शकते. मायक्रोसेफली म्हणजे शरीराच्या तुलनेने डोक्याचा आकार लहान असणे आणि मेंदूमध्ये व्यंग असणे. याव्यतिरिक्त झिका व्हायरसमुळे नवजात बालकांमध्ये उपजत आंधळेपणा, बहिरेपणा इत्यादी दोषही दिसून येतात.

गंभीर आजार होण्याची शक्यता

झिका व्हायरसमुळे प्रौढ व्यक्तींना गुलेन बॅरे (Guillain Barre syndrome) आजार होण्याची शक्यता बळावते. या आजारात रुग्णास अल्पकालीन पक्ष घात होतो. त्यामुळे त्याच्या मज्जातंतूंमध्ये इतर गुंतागुंती निर्माण होतात. झिका व्हायरसचा संसर्ग झाला तर गर्भवती महिलांना गर्भपात करावा लागतो. मुलाची वाढ कमी होऊ शकतो.

रोगाची लक्षणे

झिका व्हायरसची लक्षणे डेंग्यूसारखीच आहेत. यामध्ये अस्वस्थता जाणवणे, ताप येणे (ताप सहसा 102 डिग्रीच्या वर जात नाही), लालभडक डोळे, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ येणे, स्नायू आणि सांधे दुखणे इत्यादी लक्षणांचा समावेश होतो. सामान्यतः दोन ते सात दिवस ही लक्षणे दिसतात.

हेही वाचा: Positive News: मुंबईच्या 'टीम'ने फळवाले, दूधवाले, भाजीवाल्यांचं केलं लसीकरण

संसर्ग कसा होतो?

संसर्ग झालेली मादी मच्छर चावल्याने झिका व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश घेतो. या संसर्गाच्या फैलावास प्रामुख्याने एडिस इजिप्ती जातीचे मच्छर कारणीभूत आहेत. या मच्छरांमार्फत पीतज्वर, डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे रोग देखील पसरतात. एडिस मच्छर माणसांना दिवसाढवळ्या, त्यातही बहुतांशी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी चावतात.

झिका व्हायरसचा भारतामधील प्रसार

भारतात झिका व्हायरसची साथ सर्वप्रथम 2017 साली जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांमध्ये अहमदाबाद येथे आली. त्यानंतर त्याच वर्षी जुलै महिन्यात ही साथ तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात पसरली. आता झिका व्हायरसची तिसरी साथ जयपूरमध्ये आली आहे. दरम्यान, आता केरळमध्ये काही गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग झाला आहे.

loading image