esakal | Positive News: मुंबईच्या 'टीम'ने फळवाले, दूधवाले, भाजीवाल्यांचं केलं लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

Positive News: मुंबईच्या 'टीम'ने फळवाले, दूधवाले, भाजीवाल्यांचं केलं लसीकरण

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना लसीकरण (vaccination) संथ गतीनं सुरु आहे. समाजातील (society) प्रत्येक घटकाला लसीकरणाचा लाभ मिळाला आहेच, असं नाही. गोरगरीब, मध्यम वर्गातील काही नागरिक अजूनही कोरोना लसीकरणापासून वंचित आहेत. यामध्ये दैनंदिन गरजा भागवणाऱ्या काही अत्यावश्यक सेवेतील फळभाज्या विक्रेते, (vegetable vendors) दुधवाल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे समाजातील अशा घटकांनाही लसीकरणाचा लाभ मिळावा, यासाठी मुंबईच्या तरुणांनी (Mumbai youth) 'टीम' नावाने एक ग्रुप सुरु केला. या ग्रुपमध्ये शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. (Mumbai Teens raise funds organise vax drive for micro communities)

गरजूंना कोरोना लसीकरणाचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी या 'टीम'ने पुढाकार घेतला. या विद्यार्थ्यांनी एका आठवड्यातच श्रीमंत देणगीदारांकडून पैसे जमा केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी खासगी हॅास्पिटलशी संपर्क साधून लसी विकत घेतल्या. फळवाले, भाजीवाले, अंडी विक्रेते, सलूनमध्ये काम करणारे कर्मचारी, वृत्तवत्र विक्रेते यांचं लसीकरण केलं. या तरुणांच्या प्रयत्नातून जवळपास ३५० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ मिळाला आहे.

हेही वाचा: धक्कादायक! मुंबईत कफपरेडमध्ये तीन महिन्याच्या बाळाला घरातून पळवलं

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या विक्रेत्यांना संपूर्ण शहरात फिरावे लागते, त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. असं धिरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेच्या शिव करनानी या विद्यार्थ्याने सांगितलं. याच विद्यार्थ्याने 'टीम' ही संकल्पना सुरु केली. त्यानंतर इतर शाळेतील आणि महाविद्यालयातील १८ विद्यार्थ्यांचा या 'टीम' मध्ये समावेश केला.

हेही वाचा: अन् बोलता बोलता पंकजा मुंडेंचे डोळे पाणावले...

त्यानंतर या विद्यार्थ्यांनी विक्रेत्यांशी संपर्क केला. काही विक्रेते लस घेण्यासाठी घाबरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. "नागरिकांच्या मनात कोरोना लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही सोशल मीडियावर व्हाट्स अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ क्लीप शेअर केली. त्या व्हिडिओमध्ये कोरोना लस सुरक्षित असल्याचा संदेश नागरिकांना देण्यात आला." अशी माहिती शिवने दिली.

विद्यार्थ्यांनी कोविनच्या माध्यमातून नागरिकांची नोंदणी केली. त्यानंतर लाभार्थ्यांची आधार नंबर, फोन नंबरची माहिती नोंदवण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी पैसे जमा करण्यासाठी आसपास राहणाऱ्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. काही लाभार्थ्यांकडे लसीकर केंद्रावर येण्यासाठी प्रवास करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे आमच्या निदर्शनात आले. त्यानंतर लाभार्थ्यांना कोरोना लसीकरणाच्या खर्चासोबतच प्रवासही करता यावा यासाठी प्रत्येकी १००० रुपये जमा करण्यात आले. अशी माहिती हिल स्प्रिंग आंतराष्ट्रीय शाळेची विद्यार्थीनी गायत्री सांघीने दिली आहे.

या लसीकरण मोहिमेसाठी या विद्यार्थ्यांनी आपआपसात वेगवेगळ्या कामांची जबाबदारी घेतली. आम्ही लसीकरणासाठी जसलोक हॅास्पिटलला संपर्क साधला होता. लशींच्या मात्रा फुकट जाऊ नयेत याचीही काळजी घेण्यात आली. लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी सातत्याने लभार्थ्यांना संपर्क साधत होतो, अशी माहिती धिरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेचा विद्यार्थी यश फाडीयाने दिली. ही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम मागच्या महिन्यात बांद्रा ऑडीटोरिअम येथे राबविण्यात आली.

loading image