esakal | मुंबई महापालिका उभारणार 'जम्बो फॅसिलिटी' कोविड उपचार केंद्र; तब्बल 'इतक्या' रुग्णांवर होणार उपचार..  
sakal

बोलून बातमी शोधा

hospital

भायखळा पूर्व परिसरातील केंद्र सरकारच्या 'रीचर्डसन आणि क्रुडास' कंपनीच्या परिसरात महापालिका 1 हजार बेड' क्षमतेचे 'जम्बो फॅसिलिटी' कोविड उपचार केंद्र उभारत आहे.

मुंबई महापालिका उभारणार 'जम्बो फॅसिलिटी' कोविड उपचार केंद्र; तब्बल 'इतक्या' रुग्णांवर होणार उपचार..  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: भायखळा पूर्व परिसरातील केंद्र सरकारच्या 'रीचर्डसन आणि क्रुडास' कंपनीच्या परिसरात महापालिका 1 हजार बेड' क्षमतेचे 'जम्बो फॅसिलिटी' कोविड उपचार केंद्र उभारत आहे. या केंद्रात महापालिका अभियंत्यांनी विशेष कामगिरी करत केवळ 15 दिवसात 300 'ऑक्सीजन बेड' सह 1 हजार खाटांचे उपचार केंद्र सुरू केले आहे. 

'कोरोना कोविड19 ' बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी 'जंबो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत. त्यानंतर, आता भायखळा पूर्व परिसरात असणाऱ्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील 'रीचर्डसन आणि क्रुडास' कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील एक मोठे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. 

हेही वाचा: सर्वात मोठी बातमी : कोरोनावर आली गोळी, किंमत १०३ रुपये; मुंबईत होणार उत्पादन...

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह शहर यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात उभारण्यात येत असलेल्या या तब्बल 1 हजार खाटांची क्षमता असलेल्या उपचार केंद्राच्या उभारणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हे उपचार केंद्र जून महिन्याच्या अखेरीस रुग्ण सेवेत दाखल होईल, अशी माहिती 'इ' विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली आहे. 

300 खाटा ऑक्सीजन बेड:

'कोविड कोरोना 19 ' बाधित रुग्णांवर उपचार करताना शरीरातील प्राणवायूच्या पातळीची अर्थात 'ऑक्सिजन लेव्हल'ची महत्त्वाची भूमिका असते. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी असणाऱ्या 1 हजार खाटांपैकी 300 खाटा या 'ऑक्सीजन बेड' असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 50 डॉक्टर्स, 100 नर्सेस आणि 150 परिचर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी असे एकूण 300 कर्मचारी दिवसाचे 24 तास कार्यरत असणार आहेत. याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर बाबी देखील गरजेनुरूप उपलब्ध करून घेतल्या जाणार आहेत.

हेही वाचा: बापरे! तब्बल 'इतके' टक्के इंजिनिअरिंग पदवीधरांना नोकरीच नाही; धक्कादायक आकडेवारी आली समोर.. 

केवळ 15 दिवसात 1 हजार खाटांचे रुग्णालय:

तब्बल 1 हजार खाटांचे हे तात्पुरत्या स्वरूपातील उपचार केंद्र उभारण्यास 10 जून या दिवशी सुरुवात झाली. त्यानंतर, दिवस-रात्र पद्धतीने उपचार केंद्राची उभारणी सुरू असून महापालिकेचे अनेक अभियंते - कामगार - कर्मचारी या ठिकाणी रात्रंदिवस राबत आहेत. या महिनाअखेरीस हे उपचार केंद्र रूग्णात सेवेत दाखल होणार असल्याने केवळ 15 ते 20 दिवसात या उपचार केंद्राची उभारणी करण्यात येत आहे.

BMC to open jumbo facility center in mumbai