

Mumbai water supply cut
ESakal
मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी असल्यामुळे पालिकेने मुंबईत पाणीकपात लागू केली आहे. सध्या मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र मान्सून यंदा उशिरा येत असल्यामुळे मुंबईकरांना आणखी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. आता मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू होणार असल्याची शक्यता आहे.